सातारा : तीनजणांना मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकान आमचे आहे, तुम्ही खाली करा असे म्हणत लोखंडी बारने दोघांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माणिक पुखराज ओसवाल (वय 45, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी ममता जैन व दिपक जैन यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 17 जुलै रोजी दुपारी घडली आहे. मारहाणीत विलास ओसवाल, पुखराज ओसवाल, बिमला ओसवाल हे जखमी झाले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार देखणे करीत आहेत.