सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील तीन दारू विक्रेत्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या पुढे सातारा ते कराड जाणार्या सेवा रस्त्यात एकजण अवैधरीत्या दारुची वाहतूक करताना दि. 7 रोजी आढळून आला. संशयित अविनाश अरविंद साळुंखे (वय 39, रा. नागठाणे, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक ओंकार यादव यांनी रेड मारुन त्याच्याकडून देशी दारुसह कार जप्त केली.
दुसर्या घटनेत, सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी येथे विनोद विठ्ठल भांडवलकर (वय 43, रा. लक्ष्मी टेकडी) हा दि. 8 रोजी अवैधरीत्या दारुविक्री करत होता. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 9 हजार 450 रुपयांची दारु जप्त केली आहे.
तिसर्या घटनेत, समर्थगाव, ता. सातारा येथे विक्रम अधिकराव यादव (वय 31, रा. अतित, ता. सातारा) हा दि. 8 रोजी अवैधरित्या दारुविक्री करताना आढळून आला. त्याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 हजार 250 रुपयांची दारु जप्त केली आहे.