सातारा : पाटखळमाथा येथे सचिन वसंत महापुरे (वय३९) यांनी दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती सुनील वसंत महापुरे(वय ४२) यांनी तालुका पोलिसांत दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेत खेड येथील अक्काबाईचा मळा येथील नदीच्या कडेला असलेल्या करंजाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने नितीन श्रीधर जाधव (वय ५६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.याची फिर्याद उद्धव श्रीधर जाधव(वय ४९) यांनी सातारा शहर पोलिसांत दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहे.