सातारा : मारहाण प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंद गोविंद जाधव (वय 35, रा. करंजे, सातारा) याने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जालिंदर गणपती रणखांबे (वय 55, रा. कामाठीपुरा, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 मार्च रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा