नवी दिल्ली, दि. ९ : सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.
काँग्रेसने दावा केला होता की, इंडियाच्या ३१५ खासदारांनी मतदान केले, त्यापेक्षा इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला १५ मते कमी मिळाली. बीआरएस आणि बीजेडीने निवडणुकीत भाग घेतला नाही, तर बीआरएसचे ४ आणि बीजेडीचे राज्यसभेत ७ खासदार आहेत. लोकसभेत फक्त एक खासदार असलेल्या शिरोमणी अकाली दलानेही पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे मतदान करण्यास नकार दिला. उपराष्ट्रपतीपदाच्या २०२५ च्या निवडणुकीसाठी आज (९ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले. सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे.
जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज उपराष्ट्रपदासाठी मतदान झाले आहे. यावेळी या निवडणुकीत भाजप समर्थित एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत एकूण 782 खासदार मतदान करणार असून त्यामध्ये लोकसभेतील 543, राज्यसभेतील 233 आणि 12 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होता.
सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात 7:45 वाजता निकाल घोषित केला गेला आहे. अशातच या मतदानाला 13 खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. याचपार्श्वभूमिवर भाजप समर्थित एनडीएचे उमेदवार सी.पी , राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. सी. पी . राधाकृष्णन हे भारताचे 17 वे उपराष्ट्रपती ठरले आहेत.या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान 752 मते वैध ठरली, तर 15 मते अवैध घोषित करण्यात आली. सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या प्राधान्याचे 452 मते मिळाली, तर इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मतेच मिळाली.
ही निवडणूक थेट द्विस्पर्धी ठरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सर्वात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर इतर मंत्र्यांनी आणि खासदारांनी मतदान केले. मतदान गुप्त मतदान पद्धतीने झाले असून, खासदारांना पक्षीय व्हीप बंधनकारक नव्हते. निवडणुकीदरम्यान बीजू जनता दल (BJD), भारत राष्ट्र समिती (BRS) आणि शिरोमणी अकाली दल (SAD) यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.