शिरवळ : शिरवळ एमआयडीसीत दोन युवकांच्या झालेल्या पुर्ववमैनाऱ्यातून झालेल्या वादावादित एका तरूणाची तलवारीने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची दुदैवी घटना रात्री ११ः३० च्या सुमारास एका कंपनीच्या गेटवरच घडली. यामुळे शिरवळ औदयोगीक परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
अमर शांताराम कोंढाळकर ( वय - २ २ रा वडवाडी ता. खंडाळा ) हे मृत युवकाचे नाव असुन, तेजस महेंद्र निगडे वय १९ रा. गुणंद ता. भोर असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी कि, अमर व तेजस एकाच कंपनीत नोकरीला होते.
दरम्यान काही दिवसापूर्वी या दोघात किरकोळ भांडणे झाली होती. याचा राग तेजस निगडे याने मनात धरत बुधवारी रात्री या कंपनीतून अमर बाहेर येण्याची वाट बघत बसला होता. यावेळी त्याने पोत्यात तलवार लपवुन ठेवली होती. यावेळी अमर व त्याचा मित्र दुचाकीवरून बाहेर आल्यानंतर तेजस ने त्याला अडवुन एक कानशिलात लगावली.
यावेळी मित्राने पोबारा केला. मात्र अमर तेथेच थांबला. दरम्यान तेजस ने तलवारीने डोक्यावर हातावर व पायावर सपासप वार केले. यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत अमर कोंढाळकर हा जागेवरच मयत झाला