सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजण्याच्या दरम्यान कोडोली ग्रामपंचायतीमध्ये प्रवीण वसंतराव पवार हे ग्रामपंचायत अधिकारी तसेच त्यांचे सहकारी शासकीय काम करत असताना एक महिला, सुरज विठ्ठल मोरे, प्रमोद उर्फ बाळू जाधव, महादेव देशपांडे (तिघेही रा. कोडोली, सातारा) आणि महिलेसोबत असलेला 25 वर्षीय व्यक्ती यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तक्रारदारांना दमदाटी करत कार्यालयात व कार्यालयीन कामकाजाच्या टेबलावर सांडपाणी ओतून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी पाचही संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.
कोडोली ग्रामपंचायतीमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा