कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

by Team Satara Today | published on : 06 November 2024


सातारा : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगारे फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जागरुक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानासाठी वेळा काढा आपली जबाबदारी पार पाडावी, चला मतदान करुया लोकशाही रुजवुया, 18 वर्षाचे वय केले पार मिळाला मतदानाचा अधिकार, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, अशा आशयाचे फलक घेऊन वृद्धाश्रमात जनजागृती करण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील
पुढील बातमी
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या