श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

by Team Satara Today | published on : 03 August 2025


सातारा : विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांसाठी सुपरिचीत असणार्‍या आणि महाराष्ट्र शासनासह, जि. प. साताराने विविध पुरस्कार प्रदान करुन गौरविलेल्या, श्री. जानाई मळाई शिक्षण संस्था साताराने संस्थेचे हितचिंतक-मार्गदर्शक-आधारस्तंभ, कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे अतिभव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संस्थेच्या लोकमान्य विद्यामंदिर, माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा या शाळेमध्ये शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी स. 8 ते रात्री 8 वा. या वेळेत आयोजित केले आहे. या शिबीर विषयक माहिती देताना संस्थेचे सचिव संजीव माने यांनी सांगितले की, ‘‘आमची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापनात हातभार लावण्यात खारीचा वाटा उचलत आहे. दरवर्षी रक्त बाटल्या संकलनाचा संस्थेचा चढता आलेख असून यावर्षी संस्थेने 1000 हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्याचे ध्येय, उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होणार्‍या सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने ‘जीवनदाता गौरव भेट वस्तूंचा संच’ आणि प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे.’’ या रक्तदान शिबीराचे उद्घाटन ना. महेशदादा शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते, डॉ. सौ. अरुणाताई बर्गे, डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, तहसीलदार वैभव भिलारे, संदिपभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी संस्थेच्या सर्व हितचिंतक, आजी-माजी विद्यार्थी, पालक, संस्था कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ यांनी विक्रमी संख्येने रक्तदानास उपस्थिती दर्शवून, संस्थेच्या कार्यास पाठबळ द्यावे, असे आवाहन संजीव माने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज
पुढील बातमी
सातारमध्ये मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा...

संबंधित बातम्या