सदरबझार परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील २ तोळ्याचे गंठण हिसकावले; चेनस्नॅचर महिला असल्याने खळबळ

by Team Satara Today | published on : 18 January 2026


सातारा  : सातारा शहरातील सदरबझार परिसरात भरदिवसा झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांच्या टोळीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपये किंमतीचे २ तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील चेन हिसकावणारी व्यक्ती अज्ञात महिला असल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी पूनम नानासाहेब मोहिते (वय ३९, रा. खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूनम मोहिते या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील तिघांपैकी एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजंठा चौकात तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला; कट मारल्याच्या कारणावरून हाणामारी; दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या चाळीस फुटी पुतळ्यासाठी हालचाली सुरू; शिल्पतज्ञ अनिल सुतार व ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी

संबंधित बातम्या