नवी दिल्ली : गेल्या 15 वर्षांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. हल्ल्याच्या नियोजनात शेल कंपन्यांचा सहभाग होता. गुप्तचर अधिकाऱ्यांनीच या कंपन्या स्थापन केल्या होत्या. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटाचे केरळ कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात केरळमध्ये जन्मलेला एका नागरिकाचे नाव समोर आले आहे. हा व्यक्ती आता नॉर्वेचा नागरिक आहे.
लेबनानमधील पेजर स्फोटाचा धक्का हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला बसला. या स्फोटात हिजबुल्लाहचे 20 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. सुमारे चार हजार लोक जखमी झाले. या पेजर स्फोटाचा धसका फक्त लेबनाननेच घेतला नाही तर जागतिक महासत्ताक असलेल्या अमेरिकेनेही घेतला आहे. यामुळे घटनेनंतर अमेरिका आता सतर्क झाला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमधील चीन सॉफ्टवेअर अन् हार्डवेअरवर बंदी आणण्याचा विचार सुरु झाला आहे.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर लाखो गाड्या चालत असतील आणि अचानक सॉफ्टवेअर निष्क्रीय केले गेले तर किती मोठे विनाश होईल. यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या वाहनांच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा विचार आहे.
अमेरिकन रस्त्यावर धावणारी जवळपास सर्व वाहने कनेक्टेड आहेत. या वाहनांमध्ये ऑनबोर्ड नेटवर्क हार्डवेअर आहे. त्यातून इंटरनेटच्या माध्यमातून गाडी आत आणि बाहेर दोन्ही डिव्हाइससह डेटा शेअर करते. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील खासदारांनी एक चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, चिनी ऑटो आणि टेक कंपन्या वाहनांची चाचणी करताना संवेदनशील डेटा गोळा करतात. हा डेटा ते भविष्यात वापरु शकतात.
ब्रिटीश मीडियाच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, गुप्तचर अधिकाऱ्यांना चिनी स्पायवेअरबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी शासकीय व मुत्सद्दी वाहनांची तपासणी करून घेतली होती. तपासणीत किमान एक सिम कार्ड सापडले जे लोकेशनचा डेटा पाठवत होते. हे उपकरण एका चिनी पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले होते.
लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे हेरगिरीचे काम केले जाऊ शकते, असे मानले जात होते. परंतु आता या स्फोटानंतर नवीन प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. खूप लांब राहून इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे स्फोट करू शकतो. यामुळे निष्क्रीय करुन मोठा विनाश घडवण्याची शक्यता आहे. चीनमधील शेन्झेन येथील हुआई ही दूरसंचार कंपनी, अनेक वर्षांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चिनी अधिकारी हे उपकरण हेरगिरीसाठी वापरू शकतात. परंतु चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |