जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

 जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शीख धर्माचे श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडे तीनशेव्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी साताऱ्यात तयारी
पुढील बातमी
इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या