गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत दाम्पत्याला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 August 2026


सातारा : वडिलांवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत दाम्पत्याला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कामाठीपुरा येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पती-पत्नीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिज अलाउद्दीन मुलाणी (वय 37, व्यवसाय-केटरिंग, रा. कामाठीपुरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, प्रज्वल दत्तात्रय शिंदे व त्यांची पत्नी यांनी माझ्या वडिलांवरील गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ व दमदाटीही करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटनेचे प्रकाश साबळे यांची मागणी
पुढील बातमी
अवैध दारूविक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांचे मालगाव व परळी परिसरात छापे

संबंधित बातम्या