सुभेदार जगन्नाथ जगताप यांचे निधन

by Team Satara Today | published on : 19 July 2025


सातारा : महात्मा जोतिराव फुले यांच्या कुलभूमीचे सूपुत्र सुभेदार जगन्नाथ जगताप यांचे शुक्रवारी अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.

महात्मा फुले आश्रमशाळा कटगुण येथील मुख्याध्यापक सुकुमार जगताप यांचे ते वडिल होते. मिलिटरीत अनेक वर्षे ते सेवेत होते. तेथे १९६५ ते १९९० या कालावधीत सुभेदार म्हणून उत्कृष्ट देशसेवा बजावली. निवृत्तीनंतरही मिलिटरी संघटनेचे ते काम पहात होते. कटगुण पंचक्रोशीत त्यांच्याबद्दल आदर होता. विशेष म्हणजे ते उत्तम कबड्डीपट्टू होते. त्यांच्या निधनाने कटगुण कुलभूमीवर शोककळा पसरली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंपनीची 48 लाखांची फसवणूक करणार्‍या कर्मचार्‍यास अटक
पुढील बातमी
आकाशवाणी येथे रविवारी मोफत नेत्रचिकित्सा शिबीर

संबंधित बातम्या