सातारा : जबरी चोरी प्रकरणी पाच अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बसवराज फकीरआप्पा गुजनाल रा. शहाबंदर, पोस्ट इस्लामपूर, ता. हुकेन, जि. बेळगाव हे एमआयडीसी मधील पारले कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत जात असताना दोन मोटरसायकल वरील पाच अज्ञातांनी त्यांना अडवून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील दहा हजार पाचशे रुपये रोख, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या धर्मेंद्र छबिराम शर्मा यांच्या खिशातील पाच हजार रुपये रोख असे पंधरा हजार पाचशे रुपये लुटून जबरदस्तीने नेले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.