पूर्णाहुतीने शतचंडी याग सोहळ्याची सांगता

सातारा : येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळने  आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याची सांगता आज पूर्णाहूतीने करण्यात आली. वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस व प्रसाद शास्त्री लिमये यांच्या नेतृत्वाखाली15 ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत योनी रूपातील अग्नि कुंडामध्ये हवन सामुग्री अर्पण करून सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत श्री शतचंडी यागाचे उत्तरांग पूजन, बलिदान सोहळा, स्नान, यागाची पूर्णाहुती, दक्षिणाप्रदान, यजमानांना आशीर्वाद व  पूर्णाहूती या सोहळ्याची सांगता करण्यात आली. 

तत्पूर्वी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी या शतचंडी सोहळ्याबद्दल उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, तुम्ही ठरवले की परमेश्वर अशी भव्य कार्य करून घेतो. शतचंडी म्हणजे सप्तशती चे शंभर पाठ. अशा प्रकारात लाख पाठही केले जातात, त्याला लक्षचंडी असे म्हणतात दुर्गा सप्तशतीचा जन्म आपल्या महाराष्ट्रात वणीच्या पर्वतावर झाला. 700 श्लोकांच्या या स्तोत्रांमध्ये विशिष्ट शक्तींचा उल्लेख केला आहे. हे अनुष्ठान आज   परदेशात तसेच संपूर्ण जगात आपले जे सव्वा कोटीहून अधिक हिंदू बंधू-भगिनी आहेत, ते प्रचंड संकटात आहेत. त्यांचे रक्षण करावे तसेच आपल्या देशाचे जे काही प्रांत दुरावले आहेत, ते दुर्गादेवीने पुन्हा मिळवून द्यावेत. कारण बांगलादेशातही ढाका राजधानीत ढाक्कादेवी आहे. पाकिस्तानात हिंगुलांब्मा आहे. हे सर्व प्रांत पूर्वी भारताचेच होते. महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मीने आम्हा सर्वांना ज्ञान, धन व बल मिळवून द्यावे. अखंड सामर्थ्य तुझ्याकडून प्राप्त व्हावे. कारण आज सनातन धर्म हा संपूर्ण जगात स्वामी विवेकानंदांनी समजावून सांगितला. आजचे आपले नेते नरेंद्र आणि देवेंद्र यांचे कडूनही मूळ हिंदुधर्माचे पुनरुत्थान होऊ दे. होऊ घातलेला कुंभमेळ्याचे पर्वही अतिशय आनंदात साजरे होऊन जगदंबेने आपल्याकडून गेलेली स्थाने आपल्याला परत मिळवून देत. सिंधू नदीसारखी आपल्या देशात पुन्हा खळाळून वाहू दे अशीच प्रार्थना करूया. कारण छोट्या गोष्टी परमेश्वराकडे मागण्यापेक्षा देवीने संपूर्ण जगातील असुरांचा नाश करावा, कारण हे शक्तीला काहीच अशक्य नाही तुझ्या हुमकाराने जर 60,000  असूर क्षणात नाश पावत असतील तर जगातील सर्व असुरी शक्ती या नाश पाहून दैवी शक्तीचा प्रकाश संपूर्ण जगात पडू दे हीच आपण जगदंबे चरणी प्रार्थना करूया असे सांगितले.

दरम्यान समर्थ सदन येथे रामकृष्ण पाठशाळेच्या सौ.संगीता देशपांडे, सौ. कल्पना ताडे, व 400 महिला भगिनींनी अतिशय सुरेल अशा आवाजात देवीची स्तोत्रे तसेच विविध मंत्रांचे पठण केले. सायंकाळच्या सत्रात पुणे येथील किर्तनकार संदीपबुवा मांडके यांनी स्वामी विवेकानंदांच्या कडून संपूर्ण भाषणात मांडलेला व्यापक विचार त्यात हिंदू हाच एकमेव सण आपण धर्म असून देवाने अवतार घेत असताना इस्लाम, ख्रिश्चन यासारखी हक्काची लेकरे आज आपण पाहत आहोत. रिलीजन भरपूर आहे. मात्र धर्म हा केवळ सनातन असा हिंदू धर्मच आहे असे सांगितले.  यावेळी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले, शामराव साखरे, रामदास स्वामी संस्थांनचे विश्वस्त, वंशज प्रसाद स्वामी, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते, रमेश बुवा शेंबेकर, सातारा येथील समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, शरदबुवा जठार, सौ. कल्पना ताडे, अनघाताई देसाई, संतोष वाघ, सुनील कुलकर्णी, राजू उर्फ मुरलीधर  कुलकर्णी, अनिल प्रभुणे  विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मागील बातमी
खंडोबा-म्हाळसा यात्रेसाठी पालनगरी सज्ज
पुढील बातमी
एटीएम मशिन फोडून १७ लाखची रोकड लंपास

संबंधित बातम्या