आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?

by Team Satara Today | published on : 20 August 2025


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याची बहुचर्चित वेब सीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'  मुळे चर्चेत आहे. या सीरिजमधून तो दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. नुकताच सीरिजचा टीझर समोर आला. यामध्ये आर्यनची बोलण्याची स्टाईल, त्याची स्माईल सगळंच अगदी शाहरुख प्रमाणे आहे. आर्यनला बघून नेटकरी प्रभावित झाले आहेत. बॉलिवूडची डार्क बाजू या सीरिजमधून तो घेऊन येत आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री कोण आहे? वाचा 

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा टीझर आला. यामध्ये अनेक चेहरे दिसत आहेत. लक्ष, राघव जुयाल,मोना सिंग आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका आहे. यासोबत मुख्य अभिनेत्री आहे सहेर बंबा  सहेरच्या व्यक्तिरेखेने लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच तिच्या हॉट लूक्सनेही प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. 

सहेर बंबा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला येथे तिचा जन्म झाला. सहेर २६ वर्षांची आहे. मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तिने 2016 मध्ये 'टाइम्स फ्रेश फेस' चा किताब जिंकला होता. इथूनच तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात झाली. 

2019 मध्ये आलेल्या  'पल पल दिल के पास' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती सनी देओलचा मुलगा करण देओलसोबत झळकली. दोघांचाही हा पहिलाच सिनेमा होता. हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नसला तरी सहेरच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. त्यानंतर ती काही म्युझिक व्हिडिओ आणि वेब सीरिजमध्येही दिसली. गायक बी प्राकच्या 'इश्क नही करते' या गाण्यात ती इमरान हाश्मीसोबत दिसली होती. तसंच 'द मिरांडा ब्रदर्स' या सिनेमातही दिसली. आता रेड चिलीज एंटरटेन्मेंट अंतर्गत आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये तिला मोठी संधी मिळाली आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुधाची चहा बनवताना 100% 'या' 3 चुका होतात ज्यामुळे अमृततुल्य बनतं विष
पुढील बातमी
कास पठारावरील फुलांचा हंगाम महागला

संबंधित बातम्या