...अखेर धीरज शेळकेच्या मुसक्या आवळल्या

सातारा तालुका पोलिसांची कारवाई; दोन दिवसांची पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 10 February 2025


सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत पेट्रोलपंप परिसरात झालेल्या फायरिंग प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार धीरज शेळके याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कास पठारावरील हॉटेलमध्ये छमछम प्रकरणातून हाणामारी झाल्यानंतर व त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन गटात गेल्या दीड महिन्यांपासून वाद सुरु आहे. या वादातूनच दहा दिवसांपूर्वी दोघांवर फायरिंग करुन त्यांना जखमी करण्यात आले. फायरिंगच्या घटनेत संशयितांची धरपकड केल्यानंतर धीरज शेळके नाट्यमयरीत्या पसार झाला. पोलीस त्याला शोध होते. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. दोनच दिवसांपूर्वी धीरजचे जकातवाडी येथील घर पेटवण्याचा प्रयत्न झाला. अशा या घडामोडीत अखेर धीरज शेळके तालुका पोलिसांना सापडला. प्राथमिक माहितीनुसार तो मुंबई, पनवेल या भागात होता. अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मधमाशांच्या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर
पुढील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या