सातारा : स्क्रॅपच्या व्यवहारातून मारहाण झाल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश गुरुप्रसाद गुजर (वय 49, रा.सातारा) यांनी युसुफ कच्छी, दिपक यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार युसुफ गफार कच्छी (वय 55, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी रमेश गुजर, अभय गुजर, अभी गुजर यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी इसानी स्क्रॅप ऍन्ड मेटल येथे घडली आहे.
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी
by Team Satara Today | published on : 24 February 2025