अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : कोणतीही प्रकाशयंत्रणा किंवा रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयवंत मारुती चव्हाण (वय ५१, रा. फडतरवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेत त्यांच्यासोबत असलेले गुण्याबा शंकर चव्हाण (वय ६३) जखमी झाले आहेत.
जयवंत चव्हाण व गुण्याबा चव्हाण हे दोघे दुचाकीवरून सातारा-रहिमतपूर मार्गाने फडतरवाडीच्या दिशेने निघाले होते. खोकडवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्यावर उभी असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली अंधारामुळे त्यांच्या निदर्शनास आली नाही. परिणामी दुचाकी थेट ट्रॉलीच्या मागील बाजूस जाऊन आदळली.
अपघातात जयवंत चव्हाण यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २० सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. गुण्याबा चव्हाण यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
याप्रकरणी नितीन जयसिंग कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीत मोठे बदल; तीन दिवस प्रमुख रस्ते बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
पुढील बातमी
गणेशोत्सवाआधी सातारा पोलिसांचा ‘प्रतिबंधक’ धडाका; २०१ सराईतांवर कारवाई

संबंधित बातम्या