पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

by Team Satara Today | published on : 17 August 2024


सातारा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंब्रज ता. कराड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

या मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1 हजार 600 पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.  उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे  सहायक आयुक्त   सुनिल पवार यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३२३ जागांसाठी भरती

संबंधित बातम्या