सातारा : सासपडे, ता. सातारा येथील तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. आर्या सागर चव्हाण असे संबंधित मुलीचे नाव आहे.
रात्री उशिरा तिला सातारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी तेथे तिच्या घरातील आई-वडिलांसह नातेवाईकांचा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण होते. सासपडे गावातील चौगुल वाडायेथे चव्हाण कुटुंबीय राहण्याचा आहे वस्ती लगतच्या शाळेतच चव्हाण दांपत्याची आर्या आणि सार्थक शिकावयास आहेत.
दुपारी शाळा सुटल्यानंतर आर्या घरी आली आणि तिने वडिलांकडून चावी घेऊन घर उघडले त्यानंतर काही वेळेनंतर तिचा भाऊ सार्थक जेव्हा घरी आला तेव्हा आर्या त्याला निश्चित पडलेली दिसली. त्याने धावत जाऊन घराच्या पाठीमागील बाजूच असणाऱ्या वडिलांना खबर दिली. चव्हाण कुटुंबीयांनी तिला तात्काळ पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व तेथून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. आर्या चव्हाण हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.बोरगाव पोलीस या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत.