सातारा तालुक्यातील मानेवाडी येथे नायरा पेट्रोल पंपाजवळ बुलेटची दुचाकीला पाठीमागून धडक, ३ जण जखमी

by Team Satara Today | published on : 04 March 2026


सातारा :  तालुक्यातील मानेवाडी येथे नायरा पेट्रोल पंपाजवळ दि २३ फेब्रुवारी रोजी भरधाव बुलेट चालक ओंकार बजरंग बाबर(वय २५,राहणार काळोशी, अंबवडे ता.जि. सातारा) याने समोर चाललेल्या मोपेड दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये फिर्यादी रामदास विठ्ठल खामकर (वय ६२, रा.सोनवडी-गजवडी,ता.जि. सातारा) यांच्या डाव्या हातास व पायास तसेच त्यांची पत्नी वैजंता खामकर (वय ५८) यांच्या डाव्या पायास व उजव्या हातास तसेच नातू अर्जित रोहित खामकर (वय ४ वर्ष) याच्या डाव्या पायास गंभीर व किरकोळ दुखापत केली. याप्रकरणी रामदास खामकर यांनी दि. १ मार्च रोजी फिर्याद दिली असून ओंकार बाबर यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किरकसाल पट्टेरी तरसांची गणना करणारे ठरले राज्यातील पहिले गाव; ​कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहाय्याने सात तरसांची नोंद
पुढील बातमी
पती-पत्नीच्या भांडणामुळे रागाने पतीने सोडले घर; सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद

संबंधित बातम्या