फेसबुक कमेंटमधून महिलेची महिलेची बदनामी केल्याप्रकरणी सातार्‍यात एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : फेसबुकवरील व्हिडिओखाली आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट करून एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होऊन मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.6 रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या फेसबुक अकाउंटवर मनोहर सावंत (रा. सोनगाव, ता. जि. सातारा) याने आक्षेपार्ह कमेंट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर सावंत याने आणखी काही कमेंट करत फिर्यादीविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. संबंधित कमेंट्समधून आपली बदनामी झाल्याने विशेषतः नातेवाईकांमध्ये आपली प्रतिमा मलिन झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकारामुळे मनास लज्जा उत्पन्न होऊन मानसिक त्रास झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून मनोहर सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार यू. बी. माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दाम्पत्याला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
बदनामीकारक मेसेज, धमकीचे संदेश पाठवून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका परप्रांतीयावर गुन्हा

संबंधित बातम्या