सातारा : अतीत (ता. जि. सातारा) येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 10 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते 11 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे सात या कालावधीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूर्यकांत नारायण यादव (वय 60, रा. अतीत, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने यादव यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व 35 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कारळे करीत आहेत.