सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास देगाव ते झेंडा चौक सातारा येथील रस्त्यावर सायकलवरून जात असलेले प्रेमचंद पारस यादव रा. चंदन नगर, कोडोली यांना भरधाव ट्रकने धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी मद्य प्राशन केलेला ट्रक चालक प्रतीक विजय जाधव रा. चिमणगाव, ता. कोरेगाव याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.