सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (केबीपीआयएमएसआर), वर्षे (ता. सातारा) आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' या उपक्रमाचा यंत्रणा GST कार्यालयातील अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमात केबीपीआयएमएसआरचे विद्यार्थी श्रावणी आमणेकर आणि श्रावणी माने यांनी सायबर सुरक्षेबद्दल GST कार्यालयातील अधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी सायबर सुरक्षेच्या महत्त्वावर विशेष भर दिला आणि उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घ्यायला प्रेरित केले. या उपक्रमात सायबर सुरक्षा संबंधी माहितीपत्रकांचे वितरण देखील करण्यात आले. त्यामुळे GST कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढली असून, भविष्यातील सायबर धोके ओळखण्यास व त्यांना तोंड देण्यास हा उपक्रम नक्कीच मदत करेल. या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, संगणक विभागप्रमुख डॉ. आर. डी. कुंभार आणि पी. ए. लोखंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.