सातारा : खासदार नितीन काका पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, कार्याध्यक्ष संजय देसाई, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण तालुक्यातील कुंभारगाव व ढेबेवाडी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार नितीन काका पाटील म्हणाले, पाटण तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. येणार्या काळात या कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला जाईल. आगामी निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पाटण तालुक्यात पूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे.
यावेळी कुंभारगाव ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण, सौ. वैशाली गुरव, शितल गुरव, संजय गुरव, निवे गावातील ऋतिक माने, शुभम माने, दीपक माने, सुलोचना माने, मंगल माने, कासनी येथील प्रकाश गायकवाड, पद्माकर गायकवाड, बुरमवाडी येथील किरण पाटील, मस्करवाडी येथील मोहन मस्के, संदीप मस्करवाडीतील धनाजी कदम, रुवळे येथील पियुष पाटील, तामिनेचे प्रदीप साळुंखे, गमलेवाडीचे बाबुराव हरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शिवाजीराव महाडिक, सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, मनोज देशमुख, स्मिता देशमुख, सागर भिसे, किरण साबळे पाटील, संपतराव शिंदे, संदीप चव्हाण, बबनराव साबळे, अरविंद कदम, सचिन जाधव उपस्थित होते.