सातारा : अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करीत आहेत.