फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन नोंदणी नवीन मालिका सुरु

by Team Satara Today | published on : 11 September 2024


सातारा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण या कार्यालयाकडून फलटण व माण तालुक्यातील दुचाकी एमएच-53,चारचाकी (MH 53A), परिवहन अवजड वाहनांसाठी एमएच 53 बी, व रिक्षा एमएच 53 सी संवर्गातील वाहन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवरुन सुरु करण्यात आली आहे. ज्या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक घ्यावयाचे आहेत त्यांनी  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे आहे.

मालिकेतील क्रमांकाकरीता शासकीय नियमानुसार अर्ज व डीडी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्विकारले जातील. ज्या अर्जदारास आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यावयाचे आहेत त्यांनी विनंती अर्ज व डीडी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. अर्जासोबत डीडी हा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा तसेच सदर डीडी उपप्रादेशिक परिवहन फलटण या नावाने सादर करावा. अन्य मालिकेतील क्रमांक इतर वाहनासाठी हवा असल्यास तर नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
KISNA डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीने भारतातील 35 वे शोरूम म्हणून पुण्यात आपले पहिले खास शोरूम केले सुरू
पुढील बातमी
एक पेड मॉं के नाम उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड

संबंधित बातम्या