सर्दी खोकल्यासाठी किचनमधील 'हे' पदार्थ देतील आराम

by Team Satara Today | published on : 08 October 2025


मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळं तब्बल 18 चिमुकल्यांनी प्राण गमावले आहेत. संपूर्ण भारतात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसंच, बालकांच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये चिंतादेखील वाढली आहे. तसंच, सध्या वातावरणात बदल होतोय. आता पावसाळा संपून ऑक्टोबर हिटची जाणीव व्हायला लागली आहे. अशावेळी वातावरण बदलाचा परिणाम आपसूकच आरोग्यावर होतो.

वातावरण बदलामुळं खोकला, गळ्यात खवखव अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी खोकल्याचे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. गळ्यात खवखव, सर्दी -शिंका आणि सातत्याने रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळं अनेकजण खोकल्याचे औषध घेतात. मात्र तुम्ही खोकल्याचे औषध न घेता नैसर्गिक व घरगुती उपायदेखील करु शकता. ज्यामुळं  सर्दी- खोकल्यावर आराम मिळेल. 

आयुर्वेदात काही उपाय खूपच गुणकारी आहेत. जे तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकतात. तसंच, तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढू शकते. 

सर्दी-खोकल्यापासून आराम देणारे उपाय ( Home Remedies to Get Rid of Cough And Cold)

आलं आणि मधाचे मिश्रण

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात आणि मध खशाला आराम देते. तुम्ही एक चमचा आल्याचा रस घेऊन त्यात एक चमचा मध मिसळा. दिवसातून 2-3 वेळा हे मिश्रण घेतल्याने घशातील खवखव आणि खोकला बरा होतो. 

तुळस आणि काळीमिरीचा चहा

तुळशीच अँटी बॅक्टेरीयल गुण असतात आणि काळीमिरीत कफ बाहेर काढण्यास मदत करते. 5-6 तुळशीची पाने, 2-3 काळीमीरी वाटून त्याची पावडर, एक कप पाण्यात उकळून आणि गाळुन घेऊन गरम गरम प्या. हा चहा शरीराला उष्णता देतो तसंच, सर्दी बरी करण्यास मदत करतो. 

लसणाचे सेवन

लसणात अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. एका लसूण पाकळी कच्च चावून किंवा तुपात तळून खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरसपासून लढण्यास मदत मिळते. 

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

घसा खवखवत असेल किंवा सूज आली असेल सगळ्यात असरदार उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. एक ग्लास गरम पाण्या अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोनदा गुळण्या करा. 

हळदीचे दूध

हळदीच्या दुधात अँटी सेप्टिक गुण असतात तसंच, दूध शरीरात उष्णता ठेवते. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळते. एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्याआधी प्या. या उपायाने खोकला कमी होतो. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
पुढील बातमी
काळी जादू, खुनाचा थरार अन् न उलगडणारं रहस्य

संबंधित बातम्या