जमियत आणि खिदमत ए खलक साताराने दसरानिमित्त घडविले माणुसकीचे दर्शन

by Team Satara Today | published on : 03 October 2025


परांडा : "वोह हम मे सें नही जो खुद पेठ भर खाना खाये और उस्का पडोसी भुका सोये" ह्या मुहम्मद पैगंबर यांच्या माणुसकीच्या शिकवणीनुसार धाराशिव जिल्ह्यातील आपला देशबांधव म्हणजेच आपला शेजारी पुरामुळे उपाशी आहे हवालदिल झाला आहे आणि आपण पोट भर जेवण करून आनंद कसा साजरा करू शकत नाही त्यामुळे आपले कर्तव्य समजून जमियत उलमा ए हिंद आणि खिदमत ए खलक सातारा यांनी सातारकरांची भेट कर्तव्य समजून चिंचपूर बु. येथील देशबांधवांना पोहोचवून "तुमचा पण दसरा सण मोठा सातारकरांच्या भेटीने  नाही आनंदाला तोटा" असे दाखवून देत माणुसकीचे दर्शन घडविले.

सिना नदी खैरी नदी क्षेत्रात महापुराने थैमान  घातल्याने मराठवाडा विभागातील परांडा तालुका पूर बाधित झाला आणि कित्येकांचे संसार उजाडले, घर वाहून  गेले  संसार वाहून गेला. काबाड कष्टाने पिकविलेली शेती वाहून गेली. कॅम्प मध्ये राहावे लागले. अन्नधान्याचा तुटवडा, गरजेच्या संसारोपयोगी वस्तू नाहीत जगणे कठीण  झालेले. एकीकडे निसर्ग कोपला असतानाच त्याचा वेध घेऊन आपल्या देश बांधवाच्या अडचणी दूर करण्याची योजना सातारकर आखत होते. मुहम्मद पैगंबर स्वअस यांच्या शिकवणीनुसार  कार्यरत असलेल्या  जमियत उलमा ए हिंद आणि  खिदमत ए खलक संस्था सातारा यांनी पुरग्रस्तांच्या अडचणींचा वेध घेत मुहम्मद पैगंबर यांची  हदीस "वोह हम मेसे  नही जो खुद पेठ भर के खाना खाये  और  उसका पडोसी भुखा सोये  ह्याच्यावर  आचरण करण्याचे ठरविले आणि  सर्वात प्रथम परांडा तालुक्यात सातारकर सर्व बांधवाची भेट घेऊन  450 राशन किट, नवीन  कपडे, जुने कपडे, शालेय साहित्य, औषधे किट पोहोचविले आणि काही गाव समीर ठेवून दुर्लक्षित गावांना सर्वोतोपरी सहकार्य करायचे ठरवून दि. 2 ऑक्टोबर रोजी  आपल्या  बांधवांचा दसरा सण आनंदात  साजरा व्हावा म्हणून काही गाव दत्तक आपली जबाबदारी समजून तब्बल  200 राशन किट, कपडे, शालेय साहित्य, कम्युनिटी किचनचे साहित्य भेट दिली आणि  दसरा सण मोठा सातारकरांच्या सहाय्याने नाही आनंदाचा तोटा हा संदेश दिला.

चिंचपूर बु. शेलगाव, मुनशी अशा गावात दसरा भेट दिली. तसेच आवटी, जि. सोलापूर मधील बाधितांना देखील राशन किट दिले. आजपर्यंत सातारा जिल्ह्यातून तब्बल  1000 कुटुंबाना राशन किट पोहोचले आहेत.

गाव निहाय पाहणी करून प्रशासन आणि स्थानिक पडताळणी द्वारे गरजूंची  यादी बनविण्याचे काम जमियत चे परांडा अध्यक्ष मुर्तुझा पठाण, पत्रकार निलोफर शेख, इरफान शेख, समीर पठाण व कमिटी यांनी केले. जमियतचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या सूचनेनुसार एक हाथ माणुसकीचा हा उपक्रम सुरु आहे. मौलाना  रियाज, सादिकभाई शेख, हाजी मोहसीन, मुबीन महाडवाले यांच्या मार्गदर्शनाखाली जमियत उलमा ए हिंद, सातारा, खिदमत ए खलक, सैफुल्लाह ग्रुप, मी मुस्लिम मावळा छत्रपतींचाच्या स्वयंसेवकांच्यावतीने  "एक हाथ माणुसकीचा" उपक्रम यशस्वीपणे दुःख निवारण्याचे काम करत आहे.

दि 2 ऑक्टोबर रोजी दसरा सणाचा आनंद बांधवांना साजरा करता यावा म्हणून तात्पुरते पुनर्वसन किट चिंचपूर बु. शेळगाव, मुन्शी, परांडा, आवटी या गावातील बाधितांपर्यंत पोहोचबिण्यात आले.

चिंचपूर येथे स्थानिक शिवाजी शिंदे, रिजवान शेख, जानकीराम तात्या गायकवाड, तात्या  शिंदे, महादेव बराडे, दत्ता कोष्टी, जावेद शेख, सुभाष  सुतार, दत्ता साठे यांच्या माध्यमातून  गरजूंना किट वाटप करण्यात आले. पूरग्रस्त कॅम्प मध्ये जाऊन समस्या जाणून घेत ज्यांचा  संपूर्ण संसार वाहून गेला आहे अशा गरजूंना भांडी, कपडे, शालेय  साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी परांडाचे माजी नगरसेवक इरफान शेख हाजी  समीर पठाण साताऱ्याहून आलेले सादिकभाई शेख, मुफ्ती उबेदुल्लाह, मुफ्ती मोहसीनअली बागवान, अझहर मणेर, हाफिज शाकीर, मोहसीन कोरबू, रझिया शेख, मौलाना अब्दुल अलीम, रझिया शेख, इस्माईल पठाण, मुजफ्फर सय्यद, यासिन शेख, अझहर शेख, उपस्थित होते. सल्लाहुद्दिन बागवान, हाफिज करीम कच्छी, हाजी नदाफ, मुहम्मद शेख, साकिब शेख, युसूफ भैय्या, मझहर खराडी, साकिब बागवान,शाहरुख शेख, निसार कच्छी, अरिफ शेख भुईंज, वारीस कुरेशी कोरेगाव, मुशर्रत शेख, वाहिद  शेख, रेहान बागवान, सैफ आत्तार, अरिफ खान, असिफ फरास सलीम शेख व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक सत्कार व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहत संपन्न
पुढील बातमी
प्रा. प्राजक्ता शिंदे-सरकाळे यांना पीएचडी प्रदान

संबंधित बातम्या