सातारा : एका वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी सह चारचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजे नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर मधुकर कृष्णा गाडे रा. कोंडवे, ता. सातारा यांना एका अज्ञात मोपेड आणि एर्टिगा कार क्र. एमएच 12 व्हीएल 7889 वरील चालकांनी भरधाव वेगात धडक दिल्याने गाडे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी मोपेड आणि चारचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.