01:05pm | Apr 03, 2024 |
सातारा : समाजभूषण दलित मित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने गुरुजी यांची 91 वी जयंती भावपूर्ण वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. संस्थेच्या शाखा असणार्या कुसवडे, चिखली ता. जि. सातारा आणि जायगाव ता. कोरेगाव या ठिकाणी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून गुरुजींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या संकल्पनेतून संस्थेतील तसेच परिसरातील माता तसेच पालकांना आरोग्याविषयी सजग राहण्यासाठी तसेच काही आरोग्य समस्या असल्यास त्यावर उपचार, मार्गदर्शनाबरोबरच अन्य मुख्य कार्यक्रमांचे आयोजन संस्था कार्यालयात करण्यात आले होते. स्व. शिवराम माने यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या माजी संचालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच मृत पावलेल्या संचालकांच्या पत्नींचा सहृदय साडी चोळी, स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी संचालकांचा सत्कार नामदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी दिवंगत संचालकांच्या पत्नीचा सहृदय सत्कार भाजपाच्या डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
शिबिरासाठी उपस्थित डॉक्टरांना आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
माऊली हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एमआयडीसी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ परिसरातील सुमारे 600 हुन अधिक ग्रामस्थांनी घेतला. यावेळी उपस्थित रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. महेश शिंदे म्हणाले, समाजभूषण दलित मित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने गुरुजी यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे बघून मनास अत्यानंद होत आहे. संस्थेचे सर्वच उपक्रम हे समाजाभिमुख व स्तुत्य असल्याने अशा संस्थांचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा. संस्थेच्या संचालकांनी संस्थेसह समाजाशी बांधिलकी जपून वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. या संस्थेस आमचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असून संस्थेने अशीच उत्तुंग गगनभरारी घेत रहावी, हीच सदिच्छा मी व्यक्त करतो.
यावेळी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, संस्थेने दिवंगत संचालकांच्या कुटूंबियांचा केलेला सत्कार हा या त्या संचालकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक चांगला पायंडा असून तो सर्वांनाच दिशादर्शक आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेने समाजभूषण दलित मित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य स्वरुपात आयोजित केलेले सर्वरोग निदान शिबिर हे संस्थेचे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे प्रतिक आहे. संस्थेच्या अशा स्वरुपाच्या कोणत्याही शिबिरास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सौ. शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, एवढ्या मोठ्या सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन संस्थेने केले असतानाही शिबिराचे नेटके नियोजन सुसूत्रता आणि कमालीची आपुलकीची भावना रुग्णांना आल्हाददायक आणि त्यांच्या आरोग्य समस्येचा घटकाभर विसर पाडणारी आहे. भावी काळात सर्वांनी आपल्या आरोग्याप्रती सजग राहणे गरजेचे असून वेळच्यावेळी सर्व तपासण्या करुन आपले आरोग्य आपल्या हाती हे सूत्र अंगी बाणवावे. जेणेकरुन पुढे होणार्या शारीरिक व्याधीपासून नक्कीच सावधानता बाळगता येईल. संस्थेच्या या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो आणि संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.
या कार्यक्रमास नियोजन कमिटी सदस्य राहुल बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समिती साताराचे माजी सभापती विजय काळे, माजी जि. प. सदस्य संदीपभाऊ शिंदे, माजी पं. समिती सदस्य रामदास साळुंखे, अमोल तांगडे, समर्थनगर ग्रामपंचायत सरपंच सौ. शुभांगी डोरले, कोडोलीचे माजी सरपंच मनोज गायकवाड, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. पुष्पा जाधव, सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ. श्वेता खरे, समर्थ नगर ग्रामपंचायत सदस्या सौ. माने, सौ. हिरेमठ, सदस्य संजय भोसले, कोडोली ग्रामपंचायत माजी सरपंच गिरीश ढेंबरे, संभाजीनगर ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुभाष मगर, अजित कणसे, अहिल्यानगर ग्रामपंचायत माजी सरपंच नंदकुमार माने, संजय नाना जाधव, आशिष जाधव, बजरंग देशमुख कारंडवाडी, राहुल गोडसे खिंडवाडी, डॉ.सुखदेव आपटे, समर्थ नगर ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. मालन लोखंडे, जांभे गावचे सरपंच आनंदा सप्रे, संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग बंसल, डी.टी. जाधव, गुलाब माने, भगवान माने, अशोक माने, बळवंत फडतरे, विजय घाडगे, संस्थेच्या संचालिका कु. मनीषा कदम, सौ. वासंती माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय काळे आणि कुमारी प्रतिभा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अमोल काटे, माध्यमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संतोष रासकर, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य अमोल साळुंखे, सुनील भोसले सदस्या सौ. रिहाना शेख, सौ. सुनीता शिंदे, सौ. रोहिणी जाधव, सौ.समृध्दी जोईल, सौ. काजल जगताप, सौ.तस्मिया इनामदार, सौ. सुनीता येवले, शंकर खाडे, सौ. अंजली चव्हाण, अफरोज शेख, सुखदेव शिंदे, संस्थेचे संचालक सलीम मुलाणी आदींनी परिश्रम घेतले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |