12:26pm | Sep 29, 2022 |
मुंबई : नवरात्रोत्सव सुरू झाला आहे आणि दसराही जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटांची जय्यत तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यात एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा रंगली असून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर म्हणजे शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यास गेल्या आठवड्यात परवानगी दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यासाठी २० हजार रुपये शुल्क आणि काही डिपॉझिट भरण्यात सांगितले आहे.
शिवतीर्थावरील सभा गाजवण्यासाठी आणि शक्तिप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरेंना ६० हजारांची गर्दी जमवण्याची आवश्यकता आहे. तर शिंदे गटाला एमएमआरडी मैदानावरील आपला पहिला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी १ लाखाची गर्दी जमवण्याती गरज आहे.
औरंगाबादमधील शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्यासाठी ५ ऑक्टोबरला ३०० एसटी बसेस बुक केल्याची माहिती आहे. दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुंबईत सभा होणार आहेत. शिंदे साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी मैदानावर लाखांची गर्दी होणार आहे, असा दावा मंत्री सत्तार यांनी केला आहे.
प्रतिस्पर्धी शिवसेना गटांची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी
दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा दावा शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या सभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. आमच्या बसेस ४ ऑक्टोबरला निघतील आणि ५ तारखेला मुंबईत पोहोचतील. आम्ही सर्व व्यवस्था केली आहे. आणि रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असं मंत्री सत्तार म्हणाले. संपूर्ण राज्यातून ४ हजार बसेस बीकेसीत दाखल होतील, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या भगव्यावर बाळासाहेबांचा फोटो
शिंदे गटाच्या भगव्या झेंड्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आणि आनंद दिघेंचा फोटो असणार आहे. यामुळे भगव्या झेंड्यावरून नागरिकांमध्ये गोंधळ होणार नाही. झेंड्याचं डिझाईन निश्चित झालं आहे, अशी माहिती शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिली.
पुन्हा एक खुर्ची रिकामी ठेवणार, ठाकरे गट शिंदे गटाला डिवचणार
गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या गट प्रमुखांच्या सभेत संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली होती. दसरा मेळाव्याच्या सभेतही संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकाम ठेवली जाईल, अशी माहिती ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याने दिली. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत सध्या अर्थररोड तुरुंगात आहेत.
स्वागताची जबाबदारी ही मुंबईतील शाखाप्रमुखांवर
दादर, माहिम आणि प्रभादेवी भागात कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष गेट उभारण्यात येतील. यासोबतच दादरमध्ये स्क्रीनही उभारण्यात येईल. यावरून नागरिकांना उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकता येईल. दसरा मेळाव्याला १.४ लाखाची गर्दी होईल. तसेच कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखांवर देण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांच्या स्वागताची जबाबदारी ही मुंबईतील शाखाप्रमुखांवर देण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |