01:07pm | Sep 28, 2022 |
दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून फायद्यातील व्यवसायासाठी झगडत असलेली व्होडाफोनआयडिया कंपनी २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचे नेटवर्क बंद होऊ शकते. व्हीआयवर इंडस टॉवर्सचे जवळपास ७००० कोटींचे कर्ज थकीत आहे. जर कंपनीने तातडीने हे पैसे भरले नाहीत, तर व्हीआयला नोव्हेंबरपासून टॉवर्सचा अॅक्सेस देण्यात येणार नाही, असा इशारा इंडसने दिला आहे. असे झाले तर ग्राहकांना नेटवर्क मिळणार नाही.
इंडस टॉवर्स ही एक टॉवर कंपनी आहे, जी देशभरात टॉवरसाठी जागा भाड्याने घेऊन त्यावर टॉवर उभारून ते टेलिक़ॉम कंपन्यांना भाड्याने देते. या कंपनीने व्हीआयला सोमवारी पत्र लिहून हा इशारा दिला आहे, असे ईटीने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोमवारीच इंडस टॉवर्सच्या बोर्डाची बैठक झाली.
रिलायन्स जिओ, एअरटेलनंतर देशातील तिसरी टेलिकॉम कंपनी ही व्होडाफोनआयडियाच आहे. परंतू, दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी देखील या कंपन्यांवरचे आर्थिक संकट काही टळलेले नाही. या कंपनीवर मोठे कर्ज आहे. एअरटेल, जिओ दिवाळीतच ५जी नेटवर्क लाँच करणार आहेत. परंतू, व्होडाफोनने गेल्या महिन्यात फक्त हिंट दिली होती, त्यापुढे काहीही घोषणा केलेली नाही.
आधीचेच देणे असल्याने व्होडाफोनला ५जी साठी टॉवर घेण्यास समस्या येत आहेत. ५जी इक्विपमेंट सप्लाय करणाऱ्या कंपन्या आणि टॉवर कंपन्यांसोबत डील पक्की करण्यात समस्या येत आहेत. या कंपन्या व्हीआयकडे आधीची थकित रक्कम आणि अॅडव्हान्स पेमेंट मागत आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्यात असलेल्या कंपनीला हे शक्य नाहीय. व्हीआयवर १३ हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यातच नोकियाचे ३००० कोटी रुपये आणि स्वीडनच्या एरिक्सन कंपनीचे १००० कोटू रुपये देणे आहे.
Vodafone Idea ही UK स्थित कंपनी Vodafone Group Plc. आणि आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) यांची एकत्र केलेली कंपनी आहे. पूर्वी या दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या होत्या. काही वर्षांपूर्वीच या कंपन्या एकत्र आल्या. ही कंपनी इंडस टॉवर्सचे 7,000 कोटी रुपये आणि अमेरिकन टॉवर कंपनी (ATC) 2,000 कोटी रुपये देणे आहे. कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अद्यापपर्यंत ती कोणतीही डील करू शकलेली नाही.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |