10:31pm | Sep 26, 2022 |
सातारा : अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, उदे ग अंबे उदे अशा जयघोषात सातारा जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत शेकडो सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मंडपात दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली. यानिमित्त अनेक दुर्गामाता मंडळांनी ढोल ताशा, लेझीम पारंपारिक वाद्यांच्या गजरात ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून मूर्तींची प्रतिष्ठापना केली. सातारा शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्यामुळे एक वेगळे चैतन्यदायी वातावरण पसरले असून अनेक मंडळांनी आपल्या परिसरात रास दांडिया आणि गरबा नृत्यांचे आयोजन केले आहे. अनेक देवीभक्त नऊ दिवस उपवास करत असल्यामुळे शहरात फळ फळावळ खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
सातारा शहरातील मोती चौकातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह नवरात्र मंडळाच्या वतीने आज मोती चौक, राजवाडा परिसरातून प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गंध तारा ढोल पथक आणि ताशाच्या पथकाने सादर केलेली वाद्यांची जुगलबंदी लक्षवेधक ठरली. या प्रतिष्ठापना मिरवणुकीच्या वेळी संपूर्ण मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. मोती चौकात देवीचे मूर्तीचे आगमन झाल्यावर करण्यात आलेली फटाक्यांची तसेच कागदी पताकांची आतषबाजी लक्षवेधक ठरत होती. अनेक व्यावसायिकांनी फुलांची उधळण करत देवीला स्वागताच्या पायघड्या घातल्या. शहरातील अनेक नवरात्र मंडळांनी गेले दोन दिवस वाहतुकीला अडथळा नको म्हणून दुर्गा माता देवीच्या मूर्ती मंडपात आणून ठेवल्या होत्या. त्यांची आज विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
सातारा शहरातील देवी चौकातील कासार देवी मंदिरात तसेच प्रतापगंज पेठेतील महाकाली मंदिरात याचबरोबर शहरातील मंगळवार तळे परिसरातील शिवकालीन ऐतिहासिक श्री तुळजाभवानी मंदिरातही नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्त पुढील नऊ दिवस मंदिरांमध्ये जागर, महाआरती ,महाप्रसाद ,गोंधळ कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सातारा शहरातील भारत माता मंडळ, राजपथावरील श्री भवानी नवरात्र मंडळ, शनिवार पेठेतील श्री क्रांती मंडळ, खण आळीतील सम्राट नवरात्र मंडळ, प्रतापगंज पेठेतील प्रताप मारुती नवरात्र मंडळ यांच्याही देवींचे स्थापना प्रतिपदेला करण्यात आली. या आरतीसाठी हजारो देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सातारा शहरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरात आज विशेष अलंकार पूजा घटस्थापने निमित्त करण्यात आली होती. उद्यापासून या देवीला विविध रूपात सादर केले जाणार आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली. सातारा शहरातील कृष्णा नगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील श्री उमा देवीस विविध प्रकारच्या पूजा तसेच ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी पारायण याशिवाय महाआरती, कुंकुमार्चन, सुवासिनी आणि कुमारी पूजा याचबरोबर भरतनाट्यम तसेच विविध वाद्य वृंदांचे कार्यक्रम पुढील नऊ दिवस संपन्न होणार आहेत .
अष्टमीला विशेष पूजा होऊन नवमीला होम हवन संपन्न होणार आहे अशी माहिती नटराज मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला दरवर्षी या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. पुढील नऊ दिवस हे नवरात्र होऊन नवव्या माळेला म्हणजेच 4 ऑक्टोबरला खंडे नवमी आणि 5 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सिमुलंगणाचा कार्यक्रम होऊन नवरात्र उठवले जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवी, औंधयेथील यमाई देवी, प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात नवरात्रीसाठी विशेष पूजा करण्यात आली होती. घरोघरी सातारा जिल्ह्यात घटस्थापना करून देवघरामध्ये देवीच्या मूर्तीचे तसेच देवीचा टाक आणि देवींच्या प्रतिमांचे पूजन करून पहिली माळ विड्यांच्या पानाची तसेच पिवळ्या फुलांची बांधण्यात आली. धान्य पेरण्यात आले. आता दररोज या धान्य लक्ष्मीचे पूजन करून नवरात्री उत्सव संपन्न होत असतो.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |