09:44pm | Nov 23, 2022 |
सातारा : जबरी चोरीचा बनाव करुन नोकरानेच सुमारे 11 लाखांची रक्कम लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संशयितास अटक करीत त्याने लंपास केलेली रक्कम हस्तगत करण्यात फलटण पोलिसांना यश आले आहे. जबरी चोरीचा हा बनाव संशयिताने त्याच्या मुलीच्या उपचारासाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी 10.45 वा. च्या सुमारास यातील फिर्यादी सनी हनमंत इंगळे रा. आखरीरस्ता, मंगळवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि सातारा हे शांतीकाका सराफ या ज्वेलर्स फलटण या दुकानातील रोख कॅश रुपये 10 लाख 80 हजार रुपये आय सी.आय.सी आय बँकेत भरणा करणेसाठी ऍक्टीवा गाडीचे डिकीत पैसे ठवून जात असताना राजवैभव लक्ष्मीनगर, फलटण येथे शाईन मोटार सायकलवरून आलेल्या दोनजणांनी तुला लय माज आला आहे काय, असे म्हणून कोयत्याने डोक्यात मारुन इंगळे यांस गंभीर दुखापत करून गाडीचे डिकीमधील 10 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून पळून गेले. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन केनेकर यांच्याकडे देण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासपथकाने घटनास्थळाचे आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही. फुटेज, तसेच मोबाईल सी.डी.आर याचे तांत्रिक विश्लेषन करुन गुन्ह्यातील साक्षीदारांकडे तपास केला होता. तपासादरम्यान यातील फिर्यादी यांनी दिलेली फिर्याद व घटनास्थळाची परिस्थिती तसेच प्राप्त सीसीटीव्ही फुटेज यांचे अवलोकन करत असताना यातील फिर्यादी हे विसंगत माहिती देत असल्याचे व गुन्ह्याचा बनाव करत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न होत होते. त्यादरम्यान यातील फिर्यादी याने सदरचा गुन्हा घडल्याचे बनाव केल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज ची वेळ व फिर्यादी यांना झालेल्या जखमा यावरुन प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने यातील फिर्यादी यांचा संशय आल्याने इंगळे यांचा वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेवून इंगळे यांच्याकडे तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण य कसोशिने तपास करून हा गुन्हा घडला नसल्याचे व इंगळे यांनी या गुन्ह्याचा बनाव केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असुन हा बनाव इंगळे यांच्या मुलीला असलेल्या कॅन्सरच्या उपचाराकरीता पैशाची आवश्यकता असल्याने केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. इंगळे यांस या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्यपुर्ण तपास करुन इंगळे यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रक्कम रुपये 8 लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आलेले असून या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, दिपाली गायकवाड, स फौ कदम, पो.हवा काळुखे, पोना जगताप, पोना लावंड, पो.ना. तांबे, पो. ना. मुळीक, पोना दडस, पोकॉ. मेगावडे, सांडगे, कर्णे यांनी सहभाग घेतला.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |