दरवर्षी भक्तीभावाने दुर्गामातेचा नवरात्री सण साजरा केला जातो. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो आणि दस-याच्या दिवशी समाप्त होतो. या नऊ दिवसादरम्यान भक्त दुर्गामातेची आराधना करतात आणि दिवसभर उपवास देखील करतात.उपवासाच्या कालावधीदरम्यान भक्त धान्य किंवा डाळींपासून बनवलेले खाद्यपदार्थ सेवन करत नाहीत, तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ देखील सेवन करत नाहीत. परिणामत: शरीरातील व्हिटॅमिन्स व मिनरल्ससह आवश्यक पौष्टिक घटक कमी होण्याची शक्यता वाढते. चांगली बातमी अशी आहे की, यादरम्यान जल्लोषात सण साजरा करण्यासोबत उपवास करण्याचे आणि आरोग्यदायी व उत्साही राहण्याचे अनेक मार्ग आहेत.
आरोग्यास अनुकूल पद्धतीने उपवास करण्याबाबत जाणून घेण्यापूर्वी उपवासाचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया, जे पुढीलप्रमाणे आहेत:
• चयापचय क्रिया उत्तम होण्यास मदत होते: उपवासादरम्यान व्यक्ती सेवन करणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामत: रोगप्रतिकारशक्ती उत्तम होण्यास आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.
• हृदयाचे आरोग्य उत्तम राहते: नवरात्रीदरम्यान केला जाणाऱ्या उपवासादरम्यान वेळेवर उपवासाचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्याची खात्री मिळते आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळ्या देखील कमी होतात.
• डिटॉक्सिफिकेशनमध्ये साह्य: नवरात्रीदरम्यान सेवन केल्या जाणाऱ्या उपवासाच्या आहारामध्ये ताजी फळे व भाज्यांचा समावेश केल्यास शरीराचे डिटॉक्सिफाय होण्यास आणि एकूण आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.उपवास करण्याचे विविध मार्ग आहेत, ज्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे वजनावर नियंत्रण राहते आणि मेंदूचे कार्य उत्तमपणे होते. सात आरोग्यदायी सवयींबाबत सांगण्यात आले आहे, ज्यांचे उपवास करताना पालन केले पाहिजे.
दिवसाच्या सुरूवातीला हलक्या स्वरूपाचा व्यायाम करा:
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने तुम्ही आरोग्यदायी राहू शकता आणि आयुष्य वाढू शकते. जिमला जाण्यापूर्वी कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असले तरी उपवास करणाऱ्या व्यक्तीला हलक्या स्वरूपाचा व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. हलक्या स्वरूपाच्या व्यायामामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासोबत मूड देखील उत्साहित होतो आणि रात्रीच्या वेळी पुरेशी झोप मिळते.
वेळेवर औषधे घ्या:
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधित आजार यांसारख्या कोमोर्बिडिटीजने पीडित व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी आहाराचे व्यवस्थापन करण्यासोबत वेळेवर औषधे घेतली पाहिजेत. तसेच, टाइप १ मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे. याव्यतिरिक्त, तुम्हाला अशक्त वाटत असल्यास त्वरित काहीतरी खावे, ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडणार नाही.
दिवसभर टप्प्याटप्प्याने लहान स्वरूपात खात राहा:
दिवसाच्या शेवटी एकदम आहार सेवन करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खात राहा आणि भूक लागत असल्यास आरोग्यदायी स्नॅक्स उपयुक्त ठरू शकते. असे केल्याने रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि तुम्ही त्वरित थकणार नाही याची खात्री मिळेल. तसेच, दुपारच्या वेळी अधिक प्रमाणात आहार सेवन केला असल्यास रात्रीच्या वेळी लवकर व हलक्या स्वरूपात आहार सेवन करा, ज्यामुळे संतुलन राहिल.
हायड्रेटेड राहा:
‘निर्जल व्रत’ (पाणी न पिता उपवास) करत नसाल तर दिवसभर पाणी पित हायड्रेटेड राहा. पाणी हे हायड्रेटेड राहण्यासाठी सर्वोत्तम असले तरी तुम्ही नारळपाणी, ताक, ग्रीन टी आणि लिंबूपाणी यांचे सेवन करू शकता.
आहारामध्ये राजगिराचा समावेश करा:
या कालावधीदरम्यान शरीराला कमी प्रमाणात प्रोटीन मिळत असल्यामुळे आहारामध्ये राजगिराचा समावेश करण्याची उच्च शिफारस केली जाते, जे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे. तुम्ही दूध किंवा दलियासोबत राजगिरा-आधारित दलियाची निवड करू शकता, सोबत हंगामी भाज्यांची निवड करू शकता, ज्यामुळे शरीराला दिवसभर आवश्यक ऊर्जा मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही बटाटे व साबुदाणा यांसारखे उच्च कार्बोहायट्रेड संपन्न फूड्स सोबत कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, दुधी भोपळा यांसारख्या फायबरयुक्त भाज्या एकत्र करू शकता. तसेच भाज्यांना तळण्याऐवजी भाजण्याची, ग्रिल करण्याची किंवा बेक करण्याची खात्री घ्या.
बकव्हीट आहारामध्ये उत्तम पर्याय आहे:
कार्बोहायड्रेट्स व प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही कुट्टू किंवा बकव्हीटच्या चपाती किंवा पूरी बनवू शकता. तसेच, समक तांदळाची उच्च शिफारस केली जाते, यामुळे पचनशक्ती उत्तम होते आणि अनेक हंगामी भाज्यांसोबत सेवन केले पाहिजे.
अधिक गोड किंवा अधिक तळलेले पदार्थ सेवन करू नका:
उच्च कॅलरी असलेल्या गोड पदार्थ खावेसे वाटू शकते, पण फळे, सफरचंदाची खीर, समक तांदळाची खीर व कोशींबीर यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांसह स्वादाची पूर्तता करा. हे पदार्थ घरी बनवत असाल तर रिफाइन्ड साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करा.अधिक तळलेल्या स्नॅक्ससह पॅकेटमध्ये पॅकेज केलेले सॉल्टेड स्नॅक्सचे सेवन टाळणे सर्वोत्तम आहे, कारण मीठाचे अधिक प्रमाण व घातक फॅट्समुळे ते अनारोग्यकारक आहेत. त्याऐवजी, बदाम, मनुका व अक्रोड यांसारखे पौष्टिक नट्सचे सेवन करा. अशा सोप्या पायऱ्यांचे पालन केल्यास दीर्घकाळपर्यंत, विशेषत: सणासुदीच्या काळात तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. यासोबत लक्षात ठेवा की आरोग्यदायी आहाराचे सेवन करण्यासह नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप देखील महत्त्वाची आहे, ज्यांचे तुम्ही वर्षभर पालन केले पाहिजे.
मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार |
वडूथ येथे एकाला मारहाण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
विद्यार्थी देशाचे शिल्पकार असतात : नागराजन |
महाविकास आघाडी जिल्हयात एकीने काम करतेय |
शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा |
सातारा-जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार |
पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद |
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या |
सातारकरांनी शिवेंद्रराजेंना मताधिक्याने विजयी करावे |
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा |
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा |
सातारा-जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार |
पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद |
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या |
सातारकरांनी शिवेंद्रराजेंना मताधिक्याने विजयी करावे |
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा |
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |