02:38pm | Jun 30, 2022 |
दिल्ली : भारतात शुक्रवार १ जुलै २०२२ पासून ११ नवे नियम लागू होतील. या नियमांमुळे सामान्यांचे जीवन बदलणार आहे, त्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. सर्व काही व्यवस्थित झाले तर १ जुलैपासून देशात नवा लेबर कोड लागू होईल. या नियमामुळे कर्मचाऱ्यांची पीएफमधील रक्कम वाढेल. हातात येणारा पगार कमी होईल. कामासाठीचे तास आठ ऐवजी बारा होतील आणि वीक ऑफ तीन होतील. आठवड्यातील कामकाजाचे दिवस चार होतील.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅसच्या सुधारित किंमतीची घोषणा केली जाते. आता १ जुलैपासून सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सवलतीचा गॅस सिलेंडर तसेच विना सवलतीचा गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडर या तिन्हीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शॉपिंग पोर्टल, मर्चंट, पेमेंट गेटवे आता डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित डेटा थेटपणे स्वतःच्या सर्व्हरवर ठेवू शकणार नाहीत. हा डेटा एका टोकन क्रमांकाद्वारे सुरक्षित केला जाईल. संबंधित टोकन नंबर देऊन त्या डेटाला अॅक्सेस करता येईल. टोकन नंबर ग्राहकाकडे असेल. यामुळे त्याचा डेटा सुरक्षित राहील. आरबीआयने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी टोकन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटचे केवायसी पूर्ण करून घ्या नाहीतर १ जुलैपासून केवायसी अपडेट करता येणार नाही.आधार आणि पॅन क्रमांक लिंक करा. ही प्रक्रिया ३० जून रोजी केली तर दिरंगाईसाठी ५०० रुपयांचा दंड लागू होईल आणि १ जुलै किंवा त्यानंतर केल्यास एक हजार रुपयांचा दंड लागू होईल. व्यावसायिक भेटींवर १ जुलै २०२२ पासून १० टक्के टीडीएस लागू होईल.जर भेटवस्तू नाकारली, परत केली तर टीडीएस लागू होणार नाही.
आपल्याकडे असलेल्या एकूण क्रिप्टो करन्सीवर १ जुलै २०२२ पासून ३० टक्के कर आणि एक टक्का टीडीएस लागू होईल. दिल्लीत ३० जून २०२२ पर्यंत मालमत्ता कर भरल्यास १५ टक्के सवलत मिळेल पण १ जुलैपासून ही सवलत मिळणार नाही. हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या दुचाकींच्या दरात १ जुलै २०२२ पासून प्रत्येकी ३ हजार रुपयांची वाढ होईल. इतर कंपन्यांच्या दुचाकींच्या दरांमध्येही लवकरच वाढ अपेक्षित आहे. नव्या नियमानुसार १ जुलै २०२२ पासून देशातील सर्व फाईव्ह स्टार एसी आता फोर स्टार श्रेणीत येतील. एसीच्या दरांमध्ये सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या दरांमध्ये १ जुलै २०२२ पासून दीड ते दोन टक्के वाढ होईल
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |