11:28pm | Sep 02, 2024 |
सातारा : कास पठारावर उमलणार्या फुलांच्या हंगामासाठी कास कार्यकारी पठार समिती सज्ज झाली असून कास फुलांच्या हंगामाचे गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हंगामाच्या दृष्टीने कास समितीने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी सहा नैसर्गिक झोपड्या, पार्किंग, शौचालय, मोफत बस सेवा, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा तैनात केल्या आहेत.
सध्या पठारावर पावसाचे प्रमाण कमी झाले असून वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर पावसाच्या उघडझापामुळे पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कास पठार कार्यकारी समितीने तातडीने हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात 10 सप्टेंबर नंतर कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणार्या पर्यटकांना ऑनलाइन ची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दीडशे रुपये, गाईड फी 45 मिनिटाकरता शंभर रुपये, उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 40 रुपये प्रवेश शुल्क करण्यात येणार आहे. शालेय मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणे बंधनकारक असणार आहे. यासाठी महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र सक्तीचे करण्यात आले आहे.
पठारावर 130 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार या दरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा दिली जाणार आहे. पुष्प पठारावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. समितीचे कार्यालय तसेच राजमार्ग यासह अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच हुल्लडबाजी करणार्या पर्यटकांवर सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |