12:25pm | Sep 22, 2022 |
नवी दिल्ली : इराणमध्ये सध्या हिजाबविरोधात चांगलंच वातावरण तापलं आहे.महिला रस्त्यावर उतरुन डोक्यावरील हिजाब काढून फेकत आहेत. सार्वजनिक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत, जिथं या हिजाबची होळी केली जात आहे. बुरखा आणि हिजाबविरोधातील या आंदोलनाची जगभर दखल घेतली जात आहे. नाचत-गात हिजाब जाळणाऱ्या महिलांचा असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये शेकडो महिला शहराच्या चौकामध्ये जमलेल्या दिसत आहेत. त्यात अनेक पुरुषही आहेत, हे सर्वजण टाळ्या वाजवत आहेत, मागे ड्रमचाही आवाज येत आहे. या गर्दीच्या मधोमध एक शेकोटी पेटवली आहे. या शेकोटीसमोर एक-एक करुन महिला, तरुणी येतात, तिथं नाचतात, आपला हिजाब उतरवतात आणि तो आगीत फेकून देतात.
हा व्हिडीओ कुठल्याही साध्या आंदोलनासारखा वाटत असला, तरी तो तसा नाही आहे. हे चित्र इराणमधलं आहे, जिथं धर्माबद्दल ब्र काढणंही इथं मृत्यूदंडाला पात्र ठरतं. पण या तरुणींमधील मृत्यूबद्दलची भितीच संपलेली दिसते. कारण, त्यांना या हिजाबमध्ये त्यांचं भविष्य अंधकारात गेल्याचं दिसत आहे.
इराणमध्ये हिजाबविरोधाची ठिणगी पडली ती एका तरुणीच्या मृत्यूनंतर. त्याचं झालं असं, इराणमध्ये हिजाबची सक्ती आहे, यासाठी कठोर नियमही आहेत. याच प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षांच्या महसा अमिनी या तरुणीला ताब्यात घेतलं. मात्र, त्यावेळी तिला मारहाण झाली असा आरोप झाला. या मारहाणीनंतर ही तरुणी कोमात गेली आणि अखेर 3 दिवस कोमात राहिल्यानंतर तिचं निधन झालं.
या तरुणीच्या निधनानंतर सगळीकडे आंदोलनं सुरु झाली, इराणमधील अनेक शहरात सध्या ही आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनात तरुणींचा मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे, शेकडो तरुणही या मुलींना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. थेट व्यवस्थेला आव्हान देणारं हे आंदोलन आवाक्यात आणणं सरकारला कठीण झालं आहे. विशेष म्हणजे, इराणच्या सत्तेत असलेल्या काही महिला खासदारांनीही आंदोलनाला खुला पाठिंबा दिला आहे. इराणमध्ये महिलांवर अनेक बंधनं आहेत, ही सगळी बंधनं झुगारुन या महिला रस्त्यावर उतरत आहेत, पारतंत्र्याचं ओझं काढून फेकत आहेत, आणि समान अधिकारांसाठी भांडत आहेत.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |