इराण : इराणने इस्रायलवर केलेला मिसाइल हल्ला, इस्रायल-हिज्बुल्लाहमध्ये सुरु असलेलं युद्ध, मिडल ईस्टमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा इराणमध्ये पोहोचलाय. इस्रायल-हिज्बुल्लाह युद्धादरम्यान भारतीय युद्धनौका इराणमध्ये पोहोचण्याचे बरेच अर्थ काढले जात आहेत. इस्रायल-हिज्बुल्लाह संघर्षाने टोक गाठलय. त्याचवेळी भारतीय नौदलाची तैनाती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इराणने आता इस्रायलवर मिसाइल हल्ला सुद्धा केला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल युद्धाची स्थिती असताना भारतीय नौदलाचा ताफा इराणमध्ये का गेलाय? इस्रायलकडून इराणवर कुठल्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाचा ताफा फायरच्या खाडीत इराणी नौदलासोबत संयुक्त युद्ध अभ्यासासाठी गेला आहे. इराणच दक्षिणेकडील बंदर अब्बास येथे हा ताफा आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय नौदलाच्या या ताफ्याच नाव शांती आणि मैत्री आहे. याची कमान कॅप्टन अंशुल किशोर यांच्याकडे आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन विध्वंसक युद्धनौका आहेत. भारतीय युद्धनौका तिथे काय करणार? INS तीर, INS शार्दुल आणि ICGS वीरा या युद्धनौका फारसच्या खाडीत लॉन्ग डिस्टेंस ट्रेनिंग आणि ड्रिल्ससाठी इराणच्या बंदरात आहेत. समन्वय आणि समुद्र सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने उचलेलं हे पाऊल मानलं जातय. भारतीय आणि इराणी नौदल एकत्र सराव करतील. व्यावसायिक आदान-प्रदान, क्रॉस ट्रेनिंग विजिट, स्पोर्ट एक्टिविटी आणि मेरीटाइम सिक्योरिटी यावर विशेष लक्ष दिलं जाईल. याआधी इराणी ट्रेनिंग फ्लीटमधील जहाज बुशहर आणि टोनब ट्रेनिंगसाठी 24 मार्चला मुंबईत आले होते.
इराणी नौदलाच जहाज डेनाने फेब्रुवारी महिन्यात मल्टीलॅटरल नेवल एक्सरसाइज ‘मिलन 24’ मध्ये भाग घेतला होता. नेतन्याहू इराणला उद्देशून काय म्हणाले? इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी इराणी शासकांवर कठोर टीका केली. इराणी जनतेला उद्देशून ते काही गोष्टी बोलले. “इराणचे शासक तिथल्या जनतेचा आवाज दडपून टाकत आहेत. जो पैसा इराणच्या विकासासाठी वापरला पाहिजे तो शस्त्र आणि परदेशी युद्धांमध्ये वाया घालवत आहेत” असं नेतन्याहू म्हणाले.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |