सातारा : सातारा येथील स्व.क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकिय रुग्णालयात येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, प्रशासकिय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ. सुरज देशमुख मानसोपचार तज्ञ, डॉ. चंद्रकांत काटकर नेत्रचिकित्सक, असिस्टंट मेट्रन श्रीमती चव्हाण, श्रीमती कोळेकर यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उध्दाटन डॉ. युवराज करपे यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग व्यक्तीच्या अधिकार, समान संधी व सामाजिक समावेशनाचे महत्व डॉ. करपे यांनी अधोरेखित केले, समानता, सन्मान अणि संधी प्रत्येकासाठी दिव्यांगत्व अडथळा नाही तर क्षमता वेगळी आहे. दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत व्हावी, असे आवाहन करुन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या फिजिओथेरपी, कृत्रिम अवयव सेवा व पुनर्वसन कार्यक्रमाविषयी माहिती दिली. दिव्यांगांच्या सेवांसाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तीनी आपल्या मनोगतात जिल्हा रुग्णालयांमध्ये मिळणा-या सोयी सुविधा आणि उपचार याविषयी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अपर्णा शंभुदास मनोविकृती सामासेवा अधिक्षक यांनी केले व सुत्रसंचालन व आभार नेत्रदान समुपदेशक श्रीमती सुजाता राजमाने यांनी केले. कार्यक्रमासाठी सीमा डेरे भौतिकोपचार तज्ञ, सचिन थिटे समाजसेवा अधिक्षक, शोभा चव्हाण मानसोपचार परिचारीका, सखी दारवेकर व्यवसायोपचार तज्ञ तसेच पृथ्वी गायकवाड, श्री. जाधव, श्री सुरज यांनी परिश्रम घेतले.