अजित जगताप
सातारा: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमूकल्यांनीही विनम्र अभिवादन केले. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने अभिवादन पोष्टने एतिहास घडविला. कोरोना महामारी संकटाने केंद्र व राज्य सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विविध संघटना, राजकीय पक्ष व सरकारच्या वतीने नियमाचे पालन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात डॉ.आंबेडकर अनुयायांनी सार्वजनिक पुतळे, बुद्ध विहार तसेच घरात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारी भाषणे केली. सोशल मीडियावर सर्व जाती धर्मातील बांधवांनी उत्स्फूर्तपणे डॉ.आंबेडकर यांचे स्मरण करून फोटो व भीमगीताने मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली.
सातारा जिल्ह्यात खर्या अर्थाने सर्वधर्मसमभाव दिसून आला. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाने चांगले योगदान दिले. जिल्हाधिकारी कार्यालय ते ग्रामपंचायत स्तरावर डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायांनी विविध उपक्रम राबविले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड व जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जि.प.चे विजय गौडा, गृह राज्यमंत्री शभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांनी सातारा येथे अभिवादन केले.
वडूज येथे बुद्ध विहारात कार्यकर्त्यांसह बाल चिमुकल्यांनीही हात जोडून बुद्ध वंदना ग्रहण करून महामानवाला अभिवादन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच पोलीस बांधवांनी ही अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, पत्रकार आकाश यादव यांच्यासह मान्यवरांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ.आंबेडकर जयंती व रमजानचे उपवास एकाच दिवशी आल्याने जय भिम, जय मीन च्या जयघोषात सर्व धर्मियांनी आंबेडकर अनुयायी व मुस्लिम समाजाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम वेगाने होत आहे. याची प्रचिती आल्याचे मत कोरेगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल तात्याबा उबाळे, म्हसवडचे सेवानिवृत्त अभियंते सुनिल पोरे, वडुजचे काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष दाऊद मुल्ला, मनसे स्वयंरोजगार व रोजगार विभागाचे संघटक सुरज लोहार, जावळीचे बाळासाहेब महामुलकर व शेकडो कार्यकर्त्यानी व्यक्त केले. प्रसार माध्यमातूनही डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे लेख प्रसिद्ध करून जनजागृती केली होती. कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना ही दिलासा देण्यासाठी अनेकांनी जयंती व रमजानच्या उपवासानिमित्त प्रयत्न केले. त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |