09:55pm | Jun 10, 2023 |
सातारा : हॉटेल व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दरोडा टाकणाऱ्या १५ जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी जेरबंद केले.
अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे, अभिजीत शिवाजी मोरे (दोघेही रा. गंगापुरी, वाई), आरिफ सिकंदर मुल्ला (वय ४३), सागर तुकाराम मोरे (वय ३४), अभिमन्यू शामराव निंबाळकर (वय २५), सुरज मुन्न शेख (वय २१), संदीप सुरेश पवार (वय २३), क्षितीज ऊर्फ सोन्या वीरसेन जाधव (वय १९), गिरिष दिलीप गवळी (वय २५), प्रज्वल बाळकृष्ण पवार (वय २३), प्रतीक बाळकृष्ण पवार (वय २८, सर्व रा. भुईंज, ता. वाई), अमोल महामुलकर (रा. महामुलकरवाडी, ता. वाई), रत्नाकर मधुकर क्षीरसागर (वय २८), निलेश उमेश मोरे (वय २५, दोघेही रा. भुईंज यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ जून रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मेनवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यावसायिकास पिस्तुल रोखुन त्याच्याकडे १० लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या गळयातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने चोरली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष पवार, सपोनि रवींद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी तपास पथके तयार केली.
या तपास पथकांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रिक मुद्यांवर गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळविली. त्यानंतर संशयित आरोपींचा भुईंज, वाई, पुणे या ठिकाणांहून शोध घेवुन १५ आरोपींना अटक केली. पुढील तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |