12:53pm | Dec 14, 2020 |
वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करायला लागला असला तरी त्यांनी अद्याप आपला पराभव मान्य केला नाही. त्यांना अजूनही इलेक्टोरल कॉलेजच्या मतांवर निवडूण येण्याची आशा असल्याने या मतदानाकडे सार्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्यक्ष मतमोजणीनंतर आज राज्यांचे प्रतिनिधी असलेले इलेक्टोरल कॉलेज आज नव्या राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवारासाठी थेट मतदान करणार आहेत. अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्षांची निवड करतात. अमेरिकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला बहुमत मिळेल तोच विजयी होईल, याची खात्री नसते. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार इलेक्टोरल कॉलेज मतदान आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करतात. इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आली आहे. इलेक्टोरल कॉलेजची एकूण संख्या 538 असते. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 270 अथवा अधिक मते मिळवावी लागतात. म्हणेच ज्यावेळी नागरीक मतदान करतात त्यावेळी ते आपल्या राज्याचा प्रतिनिधी निवडतात. थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करत नाहीत. तर, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षाची निवड करतात.
निवडून आलेले इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपतीपदांसाठी मतदान करतील. हे मतदान राज्यांच्या विधीमंडळाच्या ठिकाणी अथवा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी पार पडणार. हे मतदानदेखील मतपत्रिकेवर पार पडणार आहे. सध्याच्या कलानुसार जो बायडन यांना 306 मते तर, ट्रम्प यांना 232 मते मिळण्याचा अंदाज आहे. जवळपास 32 राज्यांमधील नियमांनुसार, ज्या पक्षाच्या उमेदवाराला पॉप्युलर मते मिळाली आहेत, त्याच उमेदवाराला इलेक्टोरल कॉलेज मतदान करतात.
मतमोजणी कशी होते, निकाल कधी?
इलेक्टोरल कॉलेज यांनी मतदान केले आहे, हे प्रमाणित करण्यासाठी त्यांना सहा ’सर्टिफिकेट्स ऑफ द वोट्स’ वर स्वाक्षरी करावी लागते. राज्यांच्या राज्यपालांकडून ही मते संबंधित अधिकार्यांकडे पाठवली जातात. त्यातील महत्त्वाची प्रत सिनेटचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्याकडे पाठवली जाते. त्यानंतर अधिकृतपणे मतांची मोजणी केली जाईल. दोन प्रत इलेक्टोरल कॉलेजच्या राज्यांच्या सचिवाकडे पाठवली जाते. तर दोन प्रत अमेरिकेच्या अर्काइव्ह विभागाकडे, एक प्रत फेडरल न्यायाधीशाकडे पाठवली जाते. अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत मतमोजणी अधिकृतपणेजाहीर केली जाते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |