08:47pm | May 14, 2021 |
कराड : सामाजिक काम करताना विशिष्ट गणवेशात काम करणे योग्य नाही. उपजिल्हा रूग्णालयात जो प्रकार झाला तो पुन्हा होऊ नये, अशी ताकीद पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज उपजिल्हा रूग्णालयात दिली. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नाव न घेता त्यांनी गणवेशात येवून रूग्णांची सेवा करण्याचा प्रकार योग्य नसल्याची टिप्पणी केली. पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याची सक्त सुचनाही उपजिल्हा रूग्णालयातील अधिकार्यांना त्यांनी केली आहे.
कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी लसीकरणाची माहिती घेतली. तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील उपस्थित होते. युवक कॉंग्रेस व संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या प्रकाराचा उल्लेख करताना पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नामोल्लेख टाळला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक संघटनांना सेवा करण्यास हरकत नाही. मात्र, विशिष्ट गणवेशात येऊन काम करण्याची गरज नाही. परवा जो प्रकार झाला. तो चुकीचा आहे. पोलिस, डॉक्टरांनी गणवेश घातला पाहिजे. मात्र सामाजिक काम करणार्यांनी गणवेश घालण्याची गरज नाही. तसे पुन्हा होऊ नये, याची काळजी घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्यांना कडक शब्दात सुचना दिल्याने यंत्रणाही हडबडली आहे.
लसीकरणात पारदर्शकता आणण्याची सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली. लसीकरण केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करा. तेथील लसीकरण सुरळीत पध्दतीने होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार वाकडे व वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री गेल्यानंतर तहसीलदार वाकडे यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी नागरिकांची यादी व टोकण पध्दतीची पाहणी केली.
प्रशासनाच्या सुचनेनुसार पहिली व दुसरी लस देण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी गर्दी न करता शांततेत येऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणात पारदर्शकता आणत आहोत. तसे न झाल्यास निदर्शनास आणू द्यावे, त्यात सुधारणा होईल. नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वाकडे यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |