नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या कारवाईचा धसका घेतलेल्या पाकिस्तानने आता युद्धाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना दुसऱ्या बाजुला पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे. अनेकदा भारताच्या नादी लागून हरलेल्या पाकिस्तानने चीनच्या सैनिकांना भारतीय जवानांनी शिकविलेला धडा चांगलाच जिव्हारी लावून घेतला आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी करण्यास सुरुवात केली असून पाकव्याप्त काश्मीरमधील हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड आरक्षित केले आहेत.
गलवान घाटीमध्ये तणाव वाढल्यास त्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानी सीमेवर उमटू शकते, अशी भीती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना वाटू लागली आहे. यामुळे त्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो अशी भीती नुकतीच व्यक्त केली होती. तसेच गेल्या काही काळापासून गिलगिट, बाल्टिस्तानसह पीओके खाली करण्याची धमकी भारताने दिली आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. बाजवा यांनी पीओकेच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रामध्ये त्यांनी या भागातील सर्व हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड लष्करासाठी आरक्षित करावेत. तसेच रक्तपेढ्यांमधील 50 रक्त पिशव्याही लष्करासाठी राखीव ठेवाव्यात असे आदेश दिले आहेत. पीओकेचे आरोग्य मंत्री डॉ. मुहम्मद नजीब नकी खान यांना लष्करप्रमुख बाजवा यांनी पत्र लिहिले आहे. पाकिस्तानी सैन्यासाठी सर्व हॉस्पिटलचे 50 बेड राखीव ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सैन्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासू शकते. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक तेवढा साठा करून ठेवावा.
बाजवा यांचे पत्र अशावेळी आले आहे, जेव्हा भारताने चीनला गलवान घाटीमध्ये चांगलाच इंगा दाखविला आहे. चीन सीमेवनप युद्धसदृष्य स्थिती असून दोन्ही बाजुने सैन्याची जमवाजमव सुरु झाली आहे. एका सीमेवर तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तानकडूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे भारत पाकिस्तानवर देखील हल्ला करू शकतो अशी भीती बाजवांना वाटत आहे. गलवान घाटीमध्ये भारताने चीनला आक्रमकता दाखविली आहे, मग पीओकेसाठीही भारताकडून कडक पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे हल्ला झालाच तर त्याला तोंड देता यावे यासाठी पाकिस्तानकडून तयारी सुरु झाली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |