अजित जगताप
सातारा : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त तसेच रमजान ईद यांची सांगड घालून गुंजभर सोने खरेदी करण्यापेक्षा रुग्णालयात कॊरोना वर उपचार करणाऱ्या रुग्णांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. मनसे कार्यकर्ते सुरज लोहार यांनी वडूज मध्ये माणुसकी जपली व दोन्ही धर्माचे सण साजरे केले.
याबाबत माहिती अशी की, चारचाकी वाहनांचे पाटे बसविणे, दुरुस्त करणे अशी कामे करणाऱ्या वडूज येथील गरीब कुटुंबातील सूरज विलास लोहार यांचे दुकान लॉकडाउन मुळे बंद आहे. अशावेळी उधारीचे पैसे व बचतीच्या पैशातून उदरनिर्वाहासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वत्र आर्थिक परिस्थिती बदलली आहे. लोकांना रोजगार नाही, जेवणाचे हाल होत आहेत. अशावेळी मुहूर्तावर गुंजभर सोने खरेदी करण्यापेक्षा माणुसकी जपू, असा विचार गरीब कुटुंबातील लोहार यांनी मांडला. त्याला आई सौ. मंगल व वडील विलास लोहार, पत्नी सौ. सोनाली यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार अक्षय तृतीया व रमजान ईद निमित्त वडूज ग्रामीण रुग्णालयात आजपासून दररोज अल्पोपहार मोफत उपलब्ध करुन देण्याचा संकल्प सुरु करुन दोन्हीही सण साजरे करण्याचा आनंद मिळविला. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध, ईश्वर-अल्ला व संत, युगप्रवर्तक यांनी माणुसकी हाच धर्म असल्याचे सांगितले आहे. त्याचे अनुकरण केले आहे, असे मनसे कार्यकर्ते सूरज लोहार यांनी मत मांडले आहे. त्याच्या वडिलांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात करून विजय मिळवला आहे, त्यामुळे संकटाला सामोरे जाताना दुसऱ्यालाही मदत करण्याच्या उद्देशाने पदरमोड करणाऱ्या लोहार कुटुंबातील सदस्य यांचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यानी कौतुक केले आहे.
या उपक्रमासाठी वाकेश्वरचे शशिकांत फडतरे, रॉयल कारभार ग्रुपचे सौरभ जाधव, हॉटेल चालक राजू गाढवे, पत्रकार अजित जगताप, विशाल लोहार, ऋषिकेश लोहार व अभिजित साळुंखे व वैभव जाधव तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, सफाई कामगार, पोलीस व होमगार्ड, रुग्णांच्या नातेवाईकांना सुध्दा मोफत अल्पोहार वाटप करण्यात आला. गरीबाने गरिबीची जाण ठेवून केलेली मदत लाख मोलाची आहे, माणुसकी श्रेष्ठ ठरली असून दवा के साथ दुवा की भी जरुरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जे आहे, त्यात समाधानी आहे
माझी आर्थिक परिस्थिती चांगली असती तर निश्चितच स्वखर्चाने कोविड उपचार केंद्र सुरू केले असते. पण, ज्यांना ते शक्य आहे त्यांनी निश्चितच विचार करावा, अशी विनंती सूरज लोहार यांनी यानिमित्त केली आहे. देवळात हात जोडण्याबरोबरच मदतीचा हात देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |